Shraddha Kapoor : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये दिवाळीचे (Diwali) सेलिब्रेशन सुरू आहे. या फेस्टिव्हलसाठी वेगवेगळे स्टार्स पार्टी आयोजित करत आहेत, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स सहभागी होत आहेत. अलीकडेच एका दिवाळी पार्टीत अभिनेत्री श्रद्धा कपूरही (Shraddha Kapoor ) दिसली होती, त्यादरम्यानचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
तो एका पापाराझी इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये श्रद्धा कपूर अतिशय सुंदर अंदाजात दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ केवळ श्रद्धाच्या लूकमुळेच नाही तर तिच्या नावीन कारमुळेही चर्चेत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये श्रद्धा लाल रंगाच्या लॅम्बोर्गिनी (Lamborghini Car) कारमध्ये दिसत आहे. ती स्वतः गाडी चालवून पार्टीला पोहोचली होती. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने ही नवीन कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे. कार खरेदी केल्यानंतर, श्रद्धाला अनेकवेळा स्पॉट केले गेले आणि ती स्वतः गाडी चालवतानाही दिसली.
मात्र, आता अभिनेत्री हा व्हिडीओ समोर आल्याने तिच्या चाहत्यांना तो खूप आवडला आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.
दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, मार्चमध्ये ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तिने रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर केला होता.