यूजीसीकडून परीक्षांचे आणि नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : कोरोनामुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? याबाबत यूजीसीने अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्णय घेतला आहे. सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही महाविद्यालये 1 सप्टेंबरपासून सुरु होणार असे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

पुढील वर्षी परीक्षा 26 मे ते 25 जूनच्या दरम्यान होणार आहे. 1 ते 30 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना सुट्या असणार आहे. पुढील वर्षी विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट 2021 ला सुरू होणार आहे.

विद्यापीठातल्या परीक्षांबाबत यूजीसीने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन, असाइनमेंट, प्रोजेक्ट वर्क, इंटर्नशीपच्या आधारावर त्यांना ग्रेड दिले जातील. ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती सामन्य आहे त्या राज्यात जुलै महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यापीठ आयोगाने म्हटले आहे की, एमफिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचा अधिक कालावधी देण्यात येणार आहे. यूजीसीने दोन वेळापत्रकं दिली आहेत. एक 2019-20 या वर्षासाठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम अपूर्ण राहिला आहे. त्यासाठी एक वेळापत्रक आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.