Uddhav Thackeray On Amit Shah – अमित शहा यांचे भाजपमधील स्थान काय आहे? आता भाजपचे अध्यक्ष वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत, हे तेच सांगू शकतील. मला अमित शहांना सांगायचे, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बोलता.
तेव्हा तुमच्यामध्ये आणि तुमच्या चेलेचपाट्यांमध्ये एकवाक्यता असू द्या. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हणालो होतो आणि दोन पक्ष फोडून परत आलो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. । Uddhav Thackeray On Amit Shah
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही लोकशाहीसाठी लोकशाही पद्धतीने लढत आहोत. अमित शहांना मला सांगायचे आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरला. महाराष्ट्रात खुलेआम गुंडाराज सुरु आहे. कोण कोठेही जाऊन गोळीबार करत आहे.
यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. यांचे राज्य चालवण्याकडे कोणतेही लक्ष नसून फक्त विरोधकांवर कारवाई करत त्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. । Uddhav Thackeray On Amit Shah
अमित शहा सांगतात की, आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडला नाही. पण देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो आहे. अमित शहा यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, अशी मिश्किल टीका त्यांनी केली.