Live Cricket Score, RCB vs SRH, Indian Premier League 2024 : आज आयपीएलच्या 30व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आरसीबीच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.
सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad ) त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले आहेत आणि त्यांची नजर विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असेल, तर या हंगामात खराब फॉर्ममध्ये असलेल्या (Royal Challengers Bengaluru) आरसीबीचे विजयी पुनरागमनाकडे लक्ष असेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा ( Toss update ) कौल हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बाजूनं लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार फाफ डुप्लेसिसने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Royal Challengers Bengaluru have elected to bowl against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/OOJP7G9bLr#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/sJyCNEU0Lx
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024
या सामन्यासाठी आरसीबीने ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली आहे. मॅक्सवेलला गेल्या सामन्यात दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळेल हे निश्चित मानले जात नव्हते. लॉकी फर्ग्युसन आरसीबीकडून या सामन्यात खेळणार आहे. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
RCB vs SRH : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन.
इम्पॅक्ट सब : उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशाक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.
इम्पॅक्ट सब : सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, करण शर्मा.
दरम्यान, आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद ने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत.
IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….
RCB आणि SRH आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 23 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत सनरायझर्स हैदराबादने 12 वेळा आरसीबीचा पराभव केला आहे. तर, RCB ने एकूण 10 सामन्यांमध्ये SRH चा पराभव केला आहे. दोन्ही संघांमधील एक सामनाही अनिर्णित राहिला आहे. हैदराबादने RCB विरुद्ध सर्वाधिक 231 धावा केल्या आहेत. तर, आरसीबीने SRH विरुद्ध सर्वाधिक 227 धावा केल्या आहेत.