India vs Nepal U19 World Cup 2024 Live Cricket Score : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा सामना नेपाळशी होत आहे. सुपर सिक्स फेरीतील टीम इंडियाचा हा शेवटचा सामना आहे. सुपर सिक्समध्ये दोन गट तयार करण्यात आले असून अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. भारतीय संघ सुपर-सिक्स गटात अव्वल स्थानावर आहे. भारतीय कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs NEP Live Score : उदय आणि सचिनने सांभाळला डाव…
भारताने 36 षटकांत तीन गडी गमावून 183 धावा केल्या आहेत. भारताकडून सचिन धस 68 धावांसह आणि कर्णधार उदय सहारन 52 धावांसह खेळत आहेत. दोघांमध्ये 120 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. भारताला 62 धावांवर तिसरा धक्का बसला.
IND vs NEP Live: भारताचे तीन फलंदाज तंबूत…
भारताने 18 षटकांत तीन गडी गमावून 80 धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार उदय सहारन आठ तर सचिन दास नऊ धावांसह फलंदाजी करत आहे. आदर्श सिंग 21 धावा करून, अर्शिन कुलकर्णी 18 आणि प्रियांशू मोलिया 19 धावा करून बाद झाले.
IND vs NEP Live: भारताने टाॅस जिंकला
भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. नमन तिवारीच्या जागी आराध्य शुक्लाचा संघात समावेश करण्यात आला आहे. खेळपट्टी एकदम भक्कम दिसत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
IND vs NEP Live: दोन्ही संघांचे Playing -11
नेपाल : अर्जुन कुमल, दीपक बोहरा, उत्तम थापा (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलशन झा, दीपेश कंदेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता.
IND vs ENG 2nd Test : यशस्वी जैस्वालची दीडशतकी खेळी पूर्ण, भारताची धावसंख्या 260 धावा पार…
भारत : आदर्श सिंह, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशु मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिम्बानी, सौमी पांडे, आराध्या शुक्ला.
#U19WorldCup2024 #INDvNEP : उपांत्य फेरीसाठी युवा संघ सज्ज, Super-6 मध्ये नेपाळशी लढत…
भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास…
भारतीय संघाने आतापर्यंत गट फेरी आणि सुपर सिक्ससह एकूण चार सामने खेळले असून चारही सामने जिंकले आहेत. गट फेरीतील तिन लढतीत आशियाई चॅम्पियन बांगलादेशविरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 84 धावांनी विजय मिळवला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आयर्लंडचा 201 धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने यूएसए विरुद्ध 201 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर , सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला.