India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला आहे. भारतीय संघ सध्या 0-1 ने पिछाडीवर आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs ENG Live : यशस्वीच्या 150 धावा पूर्ण…
यशस्वी जैस्वालने 150 धावा पूर्ण केल्या आहेत. ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी त्याला उभे राहून दाद दिली. भारताने सध्या चार गड्यांच्या मोबदल्यात 272 धावा केल्या आहेत. यशस्वी 151 धावा करून आणि अक्षर पटेल 13 धावा करून क्रीजवर आहे.
150 up for Yashasvi Jaiswal 🙌🙌
Live – https://t.co/Ne2d0hI6QB #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/MxgKSpPQ18
— BCCI (@BCCI) February 2, 2024
रजत पाटीदार बाद…
पदार्पणाच्या सामन्यात रजत पाटीदार दुर्दैवाने बाद झाला. वास्तविक, रजतने रेहान अहमदच्या चेंडूचा बचाव केला. चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि स्टम्पकडे गेला. रजतने पायाच्या साह्याने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत चेंडू विकेटला(स्टम्पला) लागला होता. आऊट झाल्यानंतर रजत खूपच निराश दिसत होता. त्याने 32 धावांची खेळी खेळली आणि या खेळीत तीन चौकार मारले. रजतने यशस्वीसोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली.
रोहित,गिल आणि अय्यर पुन्हा फेल…
दरम्यान, याआधी रोहित शर्मा 14 धावा करून, शुभमन गिल 34 आणि श्रेयस अय्यर 27 धावा करून माघारी परतले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताला पहिला झटका केवळ 40 धावांवर बसला. नवोदित शोएब बशीरने रोहित शर्माला ओली पोपकरवी झेलबाद केले. त्याला 41 चेंडूत 14 धावा करता आल्या. त्यानंतर यशस्वीने शुभमन गिलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली.
गिल मोठी खेळी खेळू शकेल असे वाटत असतानाच जेम्स अँडरसनने त्याला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. भारताला दुसरा धक्का हा 89 धावांवर बसला. शुभमन पाच चौकारांच्या मदतीने 34 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यापासून तो सातत्याने अपयशी ठरत आहे.
भारताला 179 धावांवर तिसरा धक्का बसला. या कसोटीच्या पहिल्या डावातही श्रेयस अय्यर अपयशी ठरला. त्याला टॉम हार्टलीने यष्टिरक्षक फॉक्सच्या हाती झेलबाद केले. त्याला 59 चेंडूत 27 धावा करता आल्या. श्रेयसने यशस्वीसोबत 90 धावांची भागीदारी केली.