वाई तालुक्यातील दोन घटनांमध्ये
वाई – वाई तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण धोम डाव्या कालव्यात वाहून गेल्याची फिर्याद नातेवाईकांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. 4 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास विकास रामचंद्र पाटील (वय 22, सध्या रा. हॉंटेल अभिजित एमआयडीसी, वाई. मुळ रा. कोलवड, ता. यावल जि. जळगाव) हा आपल्या तीन मित्रांसोबत पेटकर वस्ती, मोतीबाग, वाई येथे पोहण्यासाठी गेला होता.
पोहायला येत नसल्याने विकासने पाण्यात उडी मारल्यानतंर पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला व बेपत्ता झाला. मित्रांनी शोधाशोध करूनही न सापडल्याने गंगापुरीतील विकासचे मेव्हणे आदिनाथ गणेश पाटील यांना फोनवरून माहिती दिली. याबाबत वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. दुसऱ्या घटनेमध्ये चिखली (ता. वाई) येथील