महाळुंगे इंगळे- भरधाव कंटेनरची पाठीमागून जोराची ठोस बसल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्या पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास निघोजे येथे घडली. तर दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी कंटेनर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
अजय दत्तात्रय बाबर (वय 23, रा. चिंचवडगाव, पुणे, मूळ रा. विटा, ता. खालापूर, जि. सांगली) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर सौरभ विजय सिंग (वय 26, रा. चिंचवडगाव, पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर अरुण अक्षय तारकेवार (वय 26, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.