Namrata Rudraaj New Film| ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून अभिनेत्री नम्रता संभेरावला मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या ती ‘नाच गं घुमा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात नम्रतासह मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील गाणं देखील सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यानंतर आता अभिनेता प्रसाद खांडेकरने नम्रतासाठी एक खास पत्र लिहिले आहे. सोबत गिफ्ट देखील दिले आहे.
नम्रताने या पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रसादनं नम्रताला दिलेलं खास गिफ्ट देखील दिसत आहे. ‘नमा’ नाव लिहिलेले हे कानातले खूपच सुंदर दिसत आहेत. प्रसादनं पत्रामध्ये लिहिलं, ‘महाराष्ट्राची लाडकी आणि टॅलेंटेड अभिनेत्री नमा! १ मे ला तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा ज्यात तू प्रमुख भूमिका करतेय असा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित होत आहे. तू खूप वर्षे या क्षणाची वाट पाहिलीस आणि आज तो क्षण आला’ आताचा हा संपूर्ण काळ जगून घे…
यात पुढे लिहिले, “यातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घे. यापुढे अजून खूप सुपरहिट सिनेमे तुझ्या नावावर लागतील पण, पहिला चित्रपट तुझ्या कायम स्मरणात राहील. म्हणून १ मे पासून प्रत्येक क्षण साठवून ठेव आणि घरात अवार्ड्ससाठी जागा पण करून ठेव. खूप खूप शुभेच्छा तू सुपरस्टार आहेस.” विशेष म्हणजे, हे पत्र प्रसादने ‘नाच गं घुमा’ सिनेमा प्रदर्शित व्हायच्या एक दिवस आधी लिहिलं होतं.
View this post on Instagram
प्रसादनं पत्रामध्ये तळटीप म्हणून लिहलं, ‘मोबाईल फॉर्मेट झाला तर पाठवलेले मेसेज अनेकदा डिलीट होतात पण, कागद तसाच राहतो. म्हणून हे पत्र लिहलं आहे. तुझ्या पहिल्या सुपरहीट सिनेमासारखा हा कागदही दिर्घकाळ टिकेल, तु हरवला नाहीस तर’.
यावर नम्रतानं खास पोस्ट करत प्रसादचे आभार मानले. तिनं लिहले, ‘सिनेमा रिलीज व्हायच्या एक दिवस आधी तू हे पत्र लिहिलंस तू नेहमीच प्रोत्साहन देत आलायस, सिनेमा सगळीकडे हाऊसफुल चाललाय, इतकं सूंदर surprise मेरा सच्चा दोस्त आणि पत्र लिहिलंस तू किती भारी रे पश्या’.
दरम्यान, ‘नाच गं घुमा’ हा सिनेमा १ मे २०२४ ला महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. यात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा:
बाहुबली पुन्हा येणार! एसएस राजामौली सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांना देणार सरप्राइज