नवी दिल्ली : मध्य प्रदेशात ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्याने राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सिंधिया आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Delhi: Defence Minister Rajnath Singh and Union Minister Nitin Gadkari arrive at BJP headquarters. pic.twitter.com/h26SNj8rjQ
— ANI (@ANI) March 10, 2020
त्याचबरोबर दिल्लीत भाजपची बैठक होत आहे. भाजपा मुख्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी पक्षाचे वरिष्ठ नेते पोहोचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा भाजप मुख्यालयात पोहचले आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी हेही या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मुख्यालयात उपस्थित आहेत.