कराड: कराड येथील सूर्यवंशी मळा रस्त्यावर ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना, सातारा जिल्ह्यातील कराड मध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारस घडली आहे.
विजय पांडुरंग शिंदे (वय ५८, रा. मंगळवार पेठ, वाडी, कराड) असे त्यांचे नाव आहे. सूर्यवंशी मळा येथील परिसरात नगरपालिकेने ड्रेनेजसाठी मोठे खड्डे खोदलेले आहेत.
मंगळवारी दुपारी तेथील रस्त्यावरून प्रवास करताना शिंदे हे दुचाकीसह त्या खड्ड्यात पडले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. ड्रेनेजचे काम सुरू असताना तेथे कोणतेही बोर्ड न लावल्याने ही दुर्घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शिंदे याना आपला जीव गमवावा लागला असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.