भीमा कोरेगाव प्रकरण: गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे: भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आरोपी लेखक गौतम नवलखा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळली आहे. गेल्या महिन्यात १५ ऑक्टोबरला गौतम नवलखा यांच्या अटकेपासून सुप्रीम कोर्टाने चार आठवड्यांचा अंतरिम संरक्षण मंजूर केला होता. उच्च न्यायलयाने गौतम नवलखा यांना अटकपूर्व जामिनासाठी संबंधित न्यायालयात जाण्यास सांगितले होते.

यापूर्वी पुणे सत्र न्यायालयाने ६ आरोपींच्या जामीन याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच मुंबई हायकोर्टाने यापूर्वीच ९ आरोपींपैकी ३ (सुधा भारद्वाज, वर्नॉन गोन्झाल्विस आणि अरुण फेरेरा) यांच्या जामीन याचिका फेटाळल्या आहेत.

माओवाद्यांशी असणाऱ्या कथित संबंधांवरून नवलखा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. त्याबाबत त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायलयात दाद मागितली होती. मात्र कनिष्ठ न्यायलयात दाद मागावी असे सांगून ही याचिका फेटळली होती. त्यानंतर नवलखा यांनी पुणे सत्र न्यायलयात अर्ज दाखल केला होता.

तसेच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेला विरोध दर्शवत नवलखाविरूद्ध सीलबंद लिफाफ्यात कागदपत्रे सादर केली होती. पोलिसांनी त्यांच्यावर एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करून एक जानेवारी २०१८ ला उसळलेल्या दंगलीला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.

नवलखाविरोधात अद्याप चौकशी सुरू असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले होते, त्यामुळे तपासाच्या टप्प्यावरची कारवाई थांबविणे योग्य ठरणार नाही. त्यानंतर नवलखा यांनी अटकेपासून बचावासाठी कोर्टाकडे दाद मागितली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.