थोड्याच वेळात गृहमंत्रालयाची पत्रकार परिषद

मुंबई- राज्यातील सत्ता स्थापनेचा गोंधळ अद्याप सुटलेला नसून, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपतींना या संदर्भात अहवाल सादर केला असून, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर दिल्लीतील सूत्रे वेगाने फिरत या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळात देखील मंजुरी मिळालाय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

त्या अनुषंगानेच सायंकाळी साडेपाच वाजता गृहमंत्रालयाच्या पत्रकार परिषद होणार आहे. जर राष्ट्रवादी बहुमत जुळवण्यास असमर्थ ठरली तर या पत्रकार परिषदेद्वारे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याची घोषणा केली जाऊ शकते. अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीनंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. तसेच गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.