शिर्डी – रिझर्व्ह बॅंकेने 2 हजाराच्या नोटा 30 सप्टेंबरनंतर चलनात राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर 2 हजाराच्या नोटा खपवण्यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या शोधू लागले. काही ठिकाणी नोट बदलण्यासाठी पैसे घेतले जात होते. ही सगळी परिस्थिती पाहता काहींनी सोने खरेदी केले तर काहींनी आपली श्रद्धा आहे तिथे दान केले.
गेल्या महिनाभरात साईबाबांच्या दानपेटीत 2 हजारच्या नोटांचे दान वाढले आहे. अवघ्या महिनाभरात तब्बल अडीच कोटी रुपयांच्या 12 हजार नोटा साईबाबांच्या दानपेटीत मिळाल्या आहेत. साईंच्या दानात तुरळक आढळणाऱ्या दोन हजारांच्या नोटा आता मात्र मोठ्या प्रमाणात भक्त दान करताना दिसत आहेत.
तुळजाभवानी चरणी देखील भक्तांचे दान
कुलस्वामिनी तुळजाभवानी ही कुलदैवत असल्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनाला राज्यातील तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान यासह विविध राज्यातून भाविक येत असतात. कुलाचार केल्यानंतर देवीला सोने, चांदी, मौल्यवान अलंकार भेट देत असतात. या अलंकाराची मोजदाद सुरू असून त्यामध्ये 207 किलो सोने, 354 हिरे आणि 2586 किलो चांदी भक्तांनी दान केली आहे.