Shah Rukh Khan – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ सुपरहिट झाल्यानंतर शाहरुख खान आता राजकुमारी हिराणीच्या ‘डंकी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाच्या यशासाठी अभिनेता नुकताच वैष्णोदेवीला पोहोचला होता. आता ‘डंकी’ रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून त्याआधीच शाहरुख खान वैष्णोदेवीनंतर शिर्डीला साई चरणी लिन झाला आहे.
वैष्णोदेवीची ही त्याची पहिलीच भेट नव्हती, याआधीही शाहरुख अनेकवेळा माता वैष्णोदेवीला गेला होता. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सुपरहिट होण्यापूर्वीच शाहरुख खान ‘वैष्णोदेवी’ला आला होता. आता शाहरुख खान ‘डिंकी’ निमित्त शिर्डीत दाखल आहे.
यावेळी अभिनेत्यासोबत त्याची मुलगी सुहाना खानही साईबाबांच्या दर्शनासाठी आली होती. यावेळी शाहरुख खान पांढरा टी-शर्ट, ब्लॅक जिपर हुडी आणि ब्ल्यू डेनिमसोबत ब्लॅक कॅप अश्या आऊटफिटमध्ये दिसला होता.
‘डंकी’ हा राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांचा एकत्र पहिला चित्रपट आहे. बेकायदेशीरपणे परदेशात जाणारे लोक आणि त्यांच्या परिस्थितीभोवती हा चित्रपट फिरत असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले आहे.
तसेच ‘डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन हिरानी, अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे. हा चित्रपट 21 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.