श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर येथील बांदीपोरा भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शिवाय, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व स्फोटकं देखील जप्त करण्यात आले आहे. कारवाईत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
#JammuAndKashmir: Two terrorists were killed in exchange of fire between security forces and terrorists in Bandipora, earlier today. Arms and ammunition recovered. Identity and affiliation being ascertained. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/sXOYdQFaet
— ANI (@ANI) November 11, 2019
या कारवाईनंतर परिसरात शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आलेली आहे. आणखी दहशतवादी या भागात दडून बसलेले असल्याची माहिती मिळालेली आहे. बांदपोरामधील लाडूरा गावात दहशतवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या गावास वेढा देत शोधमोहीम सुरू केली होती.
दरम्यान दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. यावर जवानांनी दिलेल्या चोख प्रतित्त्युरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. रविवारी सायंकाळी देखील जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.