पुणे – स्वारगेट परिसरात दुचाकी वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या दोघा सराईतांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या एका साथीदारासह महाशिरात्रीच्या सकाळी हातात लोखंडी कोयता व लोखंडी रॉडने दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट व इतर कलामांनूसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
1) आदर्श नरसिंग उदबाळे ( 23 रा. डायसप्लॉट, गुलटेकडी), अनिकेत बाबा खंडाळे ( 20 , रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटक व फरार तीघेही आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. या तीघांवरही अगोदर काही गुन्हे दाखल आहेत. दहशत माजवण्यासाठी त्यांनी सह दुचाकींची तोडफोड केली होती.
दाखल गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलीस करत असताना पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना तोडफोड करणाऱ्या आरोपींची खबर मिळाली होती. त्यानूसार त्यातील दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिशी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यांचा आणखी एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, संजय आदलिंग अंमलदार सचिन कदम, विजय कुंभार, विजय खोमणे आदींच्या पथकाने केली.