रंगा रेड्डी (तेलंगणा) – तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्हयात कनकमामिडी येथे सोमवारी एक मोठी दुर्घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. मोईनाबादमध्ये एका बांधकामाधीन असलेल्या एका खासगी इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळल्याने दोन मजूरांचा मृत्यू, तर 10 जण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. राजेंद्रनगरचे पोलीस उपायुक्त जगदीश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या खासगी इनडोअर स्टेडियम कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आणि सुमारे 10 जण जखमी झाले. एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.