Mayawati alliance with BRS। लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या बहुजन समाज पक्षाने दिवसापूर्वी उत्तर प्रदेशात एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र अन्य राज्यांमध्ये पक्ष नवे मित्रपक्ष शोधण्यात व्यस्त आहेत. आगामी निवडणुका पाहता तेलंगणात बसपाला नवा मित्रपक्ष मिळाला आहे.
बहुजन समाज पक्ष हा दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यात माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीसोबत निवडणूक लढवणार आहे. दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केलीय .
तेलांगना प्रदेश में BSP और BRS पार्टी का गठबंधन हुआ तय।
बीएसपी के प्रदेश अध्यक्ष डॉ.आरएस प्रवीण कुमार पूर्व मुख्यमंत्री बीआरएस प्रमुख के.चंद्रशेखर राव ने जल्द ही होने वाले लोकसभा चुनाव में बसपा और बीआरएस पार्टियों के बीच गठबंधन की घोषणा करने के लिए एक संयुक्त प्रेस कांफ्रेंस की। pic.twitter.com/WILCxZaOqo
— Banti Kalpi (@KalpiBanti) March 5, 2024
बीएसपीचे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष आरएस प्रवीण कुमार यांनी बीआरएस प्रमुख केसीआर यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. याविषयी बोलताना,”बीआयएस आणि बीएसपी पुढील लोकसभा निवडणुका एकत्र लढतील” असे दोन्ही पक्षाने यावेळी म्हटले. आज दोघांमध्ये जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या युतीचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे ज्यावेळी बीआरएसने एक दिवस आधीच आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
युतीची घोषणा Mayawati alliance with BRS।
बसपा नेते कांती काल्पी यांनीही या नव्या युती संदर्भात सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोन्ही नेते दिसत आहेत. याविषयी त्यांनी लिहिले, ‘बसपा प्रदेशाध्यक्ष डॉ आरएस प्रवीण कुमार, माजी मुख्यमंत्री बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बसपा आणि बीआरएस पक्षांमधील युतीची घोषणा करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.’
दरम्यान,बसपा सुप्रीमो मायावती यांनी यूपीमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील NDA चा भाग नाही. तसेच इंडिया आघाडीत देखील सामील झालेला नसल्याचे सांगण्यात आले होते. बसपाचे सर्व खासदार पक्ष सोडतील अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. अशा परिस्थितीत बसपा सुप्रीमो नवीन रणनीती घेऊन मैदानात उतरत आहेत. ज्यांची तिकिटे कापली गेली आहेत किंवा कोण बंडखोरी करू शकतात, अशा इतर पक्षांच्या नेत्यांवर बसपाची नजर आहे.