गुप्तचर यंत्रणांची माहिती: सतर्कतेचा आदेश
नवी दिल्ली : देशात मोठा घातपात करण्याच्या हेतूने आयएसआयच्या दोन दहशतवाद्यांनी दिल्लीत घुसखोरी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारवाया करून भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीत दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे दिसत आहे.
दिल्लीत घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांची रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. तसेच या रेखाचित्राव्दारे दहशतवाद्यांचा शोध घेण्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या दहशतवाद्यांची कोणालाही माहिती मिळाली तर तातडीने पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या कमांडोज दहशतवाद्यांना गुजरातच्या कांडला पोर्टवर दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाल्याने इथल्या सर्वच बंदरांवर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.