पुणे – शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार रखवालदार युवराज विश्वनाथ गरासे (51,रा.बिबवेवाडी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीची अल्पवयीन मुलगी मावशीकडे सिटी पार्क सोसायटीमध्ये गेली होती. ती चिल्ड्रेन प्ले एरियात एकटीच खेळत असताना रखवालदाराने तीच्यावर अत्याचार केला. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.
तर वानवडी पोलीस ठाण्यात एका 31 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार कुंडलिक गुलाबराव जाधव (40) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी हा फिर्यादीच्या घराशेजारी रहात आहे. त्याने फिर्यादीच्या दहा वर्षाच्या मुलीला घरात बोलावून घेतले. तीच्यासोबत असलेल्या मैत्रीणीला घराबाहेर काढले. यानंतर तीचे तोंड ओंढणीने बांधून तीच्यावर अत्याचार केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोगदंड करत आहेत.
महिलेला कॉल करुन त्रास
एका 32 वर्षीय महिलेला एका मोबाईलधारक व्यक्तीने कॉल करुन त्रास दिल्याची घटना घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिलेस एका व्यक्तीने तु मला आवडतेस, मागील चार ते पाच महिण्यापासून मी तुझ्या मागे आहे. तुझा पत्ता दे, तु मला होकार दे नाहीतर तुला बघुन घेईन असा संवाद साधत विनयभंग करुन धमकी दिली. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आजगेकर करत आहेत.