चंडिगढ – पंजाब पोलिसांनी बुधवारी अमृतसरजवळ झालेल्या चकमकीत दोन गुंडांना ठार केले. ते गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी होते. संबंधित चकमकीचे थरारनाट्य जवळपास पाच तास सुरू होते.
जगरूपसिंग रूपा आणि मनप्रितसिंग उर्फ मन्नू कुसा अशी मारल्या गेलेल्या गुंडांची नावे आहेत. मुसेवाला यांची 29 मे यादिवशी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर रूपा आणि कुसा फरार होते. मुसेवाला यांच्या हत्येत ते प्रत्यक्ष सामील असल्याचा संशय आहे.
भारत-पाकिस्तान सीमेजवळ असणाऱ्या अमृतसर नजीकच्या एका गावात ते दडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मोहीम हाती घेऊन त्यांनी आश्रय घेतलेल्या इमारतीला वेढा घातला. पोलिसांना पाहून रूपा आणि कुसा यांनी गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली.
OBC Reservation : बावनकुळे यांचा आरोप बिनबुडाचा – छगन भुजबळ
त्यामध्ये दोन्ही गुंड मारले गेले. त्यांच्याकडील एके-47 रायफल आणि पिस्तुल जप्त करण्यात आले. चकमकीत तीन पोलीसही जखमी झाले. मात्र, त्यांच्या प्रकृतीला कुठला धोका नसल्याचे समजते. चकमकीत ठार झालेल्या गुंडांकडील बॅगही ताब्यात घेण्यात आली. ती बॅग तपासणीसाठी न्यायवैद्यक पथकाकडे सोपवली जाणार आहे.
वरूण गांधी यांचा पुन्हा आपल्या सरकारवरच हल्लाबोल; महागाईच्या मुद्द्यावर म्हणाले…