नवी दिल्ली – खलिस्तान समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पंजाब पोलिसांनी फरार अमृतपाल सिंगला मोगा येथून अटक केली आहे. अमृतपाल १८ मार्चपासून फरार होता. पोलिसांनी त्याचा काका आणि अनेक साथीदारांना देखील अटक केली आहे.
पंजाब पोलिसांनी अमृतपालच्या अटकेला दुजोरा दिला आहे. अमृतपालला मोगा येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच लोकांना फेक न्यूज शेअर करू नका असे देखील सांगण्यात आले आहे.
अमृतपाल यांना आसाममधील दिब्रुगड येथे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिब्रुगडमध्ये त्याची चौकशी करण्यात येणार आहे. अमृतपालला ताब्यात घेतल्याचे काही फोटोही समोर आले आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती देखील प्रसारित केली आहे.
अमृतपाल सिंगला अटक होण्यापूर्वी रोडेवाला गुरुद्वारात दिसला होता. यानंतर मुक्तसर पोलिसांनी त्यांना सोबत घेतले. हा व्हिडिओ रविवारी पहाटे ४ वाजताचा आहे.पंजाब पोलिसांकडून अमृतपालच्या शोधात अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले. विशेष म्हणजे, 23 फेब्रुवारी रोजी अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांनी सहकारी लवप्रीत तुफानच्या सुटकेची मागणी करत अजनाळा पोलिस स्टेशनवर शस्त्रांसह धडक दिली होती. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले.
#AmritpalSingh arrested in Moga, Punjab.
Further details will be shared by #PunjabPolice
Urge citizens to maintain peace and harmony, Don’t share any fake news, always verify and share.
— Punjab Police India (@PunjabPoliceInd) April 23, 2023
अमृतपालची पत्नी किरणदीप कौर पोलिसांच्या ताब्यात आहे
अमृतपालला अटक करण्यापूर्वी त्याची पत्नी किरणदीप कौर हिला पोलिसांनी शुक्रवारीच ताब्यात घेतले होते. किरणदीप कौरला अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. किरणदीप एअर इंडियाच्या विमानाने बर्मिंगहॅमला जाणार होती. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला प्रवास करू दिला नाही आणि ताब्यात घेतले.