शिक्रापूर -येथे दररोज होणारी करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या वतीने दोन दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दोन दिवस आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
शिक्रापूर येथे दररोज करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शिक्रापूर गावामध्ये 12 सप्टेंबर पर्यंत 447 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमअंतर्गत दि. 15 व दि. 16 सप्टेंबर रोजी जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत गावातील सर्व लहान मोठ्या कंपन्या, बॅंका, दुकाने, उद्योग बंद ठेवण्यात येणार असून फक्त अत्यावश्यक सेवांना यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.