सातारा जिल्ह्यात दोन करोनाबाधितांचा मृत्यू

सातारा – जिल्ह्यात मंगळवारी (दि. 2) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 62 नागरिक करोना संक्रमित झाले असून, गेल्या 24 तासांमध्ये दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. दरम्यान, बाधितांचे प्रमाण घटले असले तरी अजूनही होणारे करोनाबळी चिंता वाढवणारे आहेत. धोका पूर्णपणे टळला नसल्याने नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे आवश्‍यक आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात मंगळवार पेठ, मल्हार पेठ, पंताचा गोट, सदरबझार प्रत्येकी एक, इतरत्र सहा, मांडवे पाच, नागठाणे दोन, जवळवाडी, कोडोली, बोरगाव, बोरजाईवाडी, कुमठे प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यात वडगाव हवेली, रेठरे बुद्रुक, बानुगडेवाडी प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यात काळज दोन, वाठार निंबाळकर एक, खटाव तालुक्‍यात खटाव, जायगाव, जाखणगाव, उंबरमळे, वडूज प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात सासुर्वे सहा, किन्हई दोन, रहिमतपूर, सुर्ली प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यात लोणंद तीन, खंडाळा, शिरवळ प्रत्येकी एक, वाई तालुक्‍यात कळंबे दोन, वाई शहर, कवठे, जांब प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्‍यात पाचगणी, लिंगमळा प्रत्येकी एक, माण तालुक्‍यात मलवडी तीन, गोंदवले बुद्रुक, पळशी प्रत्येकी एक, इतर दोन, असे 62 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना कढाणे, ता. पाटण येथील 61 वर्षीय पुरुष व रुई, ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष, अशा दोन बाधितांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या 1821 तर बाधितांची एकूण संख्या 56 हजार 603 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.