मॅंचेस्टर – भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढत एखाद्या धर्मयुध्दासारखीच खेळली जाते. अंतिम सामन्यापेक्षाही या लढतीबाबत कमानीची उत्कंठा असते. आज येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामनाही त्यास अपवाद नाही. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तान संघाने जिंकला आहे. पाकिस्तान कर्णधार सर्फराझ अहमद याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
विश्वचषकातील या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्हीही संघात बदल करण्यात आलेले आहे. भारतीय संघाने दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला संधी दिली आहे. तर पाकिस्तान संघाने देखील आपल्या संघात बदल करत शादाब खान आणि इमाद वसीम यांना संघात स्थान दिले आहे.
Shadab Khan ✅
Imad Wasim ✅
Vijay Shankar ✅Two changes for Pakistan, one change for India ahead of the big game today.
FOLLOW ON OUR #CWC19 APP ⬇️
APPLE 👉 https://t.co/whJQyCahHr
ANDROID 👉 https://t.co/Lsp1fBwBKR pic.twitter.com/rvrPvqXt30— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 16, 2019
भारतीय संघ पुढील प्रमाणे – रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, एमएस धोनी, केदार जाधव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
Match 22. India XI: R Sharma, KL Rahul, V Kohli, V Shankar, K Jadhav, MS Dhoni, H Pandya, B Kumar, K Yadav, Y Chahal, J Bumrah https://t.co/GuJZFwzObH #IndvPak #CWC19
— BCCI (@BCCI) June 16, 2019
पाकिस्तान संघ पुढीलप्रमाणे – इमाम-उल-हक, फ़ख़र ज़मान, बाबर आज़म, मोहम्मद हफीज़, सरफ़राज़ अहमद, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब ख़ान, हसन अली, मोहम्मद आमिर, वहाब रियाज
Match 22. Pakistan XI: F Zaman, Imam ul-Haq, B Azam, M Hafeez, S Ahmed, S Malik, I Wasim, S Khan, H Ali, Wahab Riaz, M Amir https://t.co/GuJZFwzObH #IndvPak #CWC19
— BCCI (@BCCI) June 16, 2019