गोड्डा : काही ग्रामस्थांचे जबरदस्तीने धर्मामतर केल्याच्या आरोपावरून एका ख्रिस्ती धर्मप्रसारकासह दोघांना अटक करण्यात आली. या दोघांनी चर्चच्या उभारणीसाठी जमीन देण्यासाठी दबाव आणला होता, अशी माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
फादर विनोद व्हिके (मुळ रा. केरळ) आणि त्यांचा साथिदार मुन्ना हंसदा यांना झारखंड धार्मिक स्वातंत्र्य कायद्याखाली अटक करण्यात आली.त्यांच्याविरोधात एका ग्रामस्थाने फिर्याद दिली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेंद्र कुमार यांनी दिली.
या दोघांना न्यायालयापुढे हजर केले असता 14 दिवर न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.अद्याप अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.