पुणे : शरद यादवप्रणित लोकतांत्रिक जनता दलाच्या युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी कुलदीप आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकतांत्रिक जनता दलाच्या महासचिव सुशिला मोराळे, युवा अध्यक्ष सलीम मुद्दावार यांनी आंबेकर यांना नियुक्ती पञ दिले.
यावेळी मोराळे म्हणाल्या, पुण्यातील विदयार्थी चळवळीत अत्यंत अग्रेसर असणारे कुलदीप यांच्याकडे राज्यातील युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवत अहोत. संविधान, लोकशाही, समाजवादी विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याच काम ते यापुढे मोठया उत्साहात करतील अशी खात्री आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली आहेत. ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मेसची सुविधा देण्याचा उपक्रम एक वर्षांपासून राबवत असल्याची माहितीही मोराळे यांनी यावेळी दिली .