X Down : एलोन मस्क यांच्या मालकीची सोशल मीडिया वेबसाइट एक्स (ट्विटर) आज गुरुवारी (20 डिसेंबर 2023) बंद झाली आहे. ट्विटर वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर कोणतेही ट्विट दिसत नाहीये. सकाळी 11 च्या सुमारास, ट्विटर वापरकर्त्यांनी प्लॅटफॉर्ममध्ये समस्यांबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली.
वेबसाइट आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, आज (20 डिसेंबर 2023) सकाळी 11 वाजता, 70000 हून अधिक वापरकर्त्यांनी Twitter (X) काम करत नसल्याची तक्रार केली आहे. X च्या अॅपमध्ये सर्वाधिक समस्या (65 टक्के) दिसल्या. आणि 29 टक्के वापरकर्त्यांनी वेबसाइट ठप्प झाल्याची तक्रार केली.
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ भारतातच नाही तर जगभरातील युजर्सना एलोन मस्कचा एक्स वापरताना अडचणी येत आहेत. या आउटेजबाबत X कडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ट्विटर एका वर्षात तिसऱ्यांदा डाऊन झाले आहे. X वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर समस्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही.