मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल झालेली मालेगाव येथील सभा चांगलीच वादळी ठरली. त्यासोबतच मालेगावात उर्दूमध्ये लागलेले बॅनर देखील चांगलेच चर्चेत होते. याच बॅनरवरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. यानंतर याला उत्तर म्हणून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाचा उर्दूतील एक बॅनर ट्विट केला. यावरून म्हात्रे आणि आव्हाड यांच्यात ट्विटरवॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे काही दिवसांपूर्वी मॉर्फ व्हिडीओमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आता ठाकरे गटावर टीका केल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. “ह्या मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं..नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा ?”असा सवाल करत म्हात्रे यांनी ठाकरेंचे उर्दूतील पोस्टर ट्विट केले. जितेंद्र आव्हाडांनी म्हात्रे यांच्या ट्विटला रिट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.
ह्या मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं..
नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही?
*हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा??*#उध्वस्त_ सेना #खांग्रेसची_चमचेगिरी #मालेगाव pic.twitter.com/5mrPtdc7ww— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 25, 2023
जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला उर्दूतील बॅनर रिट्विट केला आहे. “ह्याच्यावर बोला ताई .. खास तुमच्या माहिती साठी..कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे” असा सवाल विचारात आव्हाडांनी म्हात्रेंना टोला देखील लगावला आहे. तर आव्हाडांच्या या ट्विटला म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
ह्याच्यावर बोला ताई .. खास तुमच्या माहिती साठी..कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे @sheetalmhatre1 https://t.co/64DVwmUXlp pic.twitter.com/fun4qGi3ej
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023
“मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणा-या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलाच झोंबलेलं दिसतयं… पण मला एक समजत नाही मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय” असा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे. ज्यावर आव्हाडांनी पुन्हा ट्विट करत म्हात्रेंना उत्तर दिल. “मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही..लोकांसाठी कार्येक्रम करतो.. माझ्या मतदार संघात येऊन विचारा.. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही.. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा.. धूर कुठुन निघाला..” असं आव्हाड म्हणाले.
मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही … लोकान साठी कार्येक्रम करतो .. माझ्या मतदार संघात येऊन विचारा …. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही …. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा… धूर कुठुन निघाला.. @sheetalmhatre1 https://t.co/ip9QEGcCsu
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023
यावर पुन्हा एकदा म्हात्रेंनी ट्विट केलं विशेष म्हणजे म्हात्रेंच्या या ट्विटला आव्हाडांनी पुन्हा एकदा जशास तसे उत्तर दिले. “पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी.लगे रहो भाईजान” असं म्हात्रे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या. त्यावर आव्हाड म्हणतात,”त्याची आपल्याला चिंता नसावी.. उगाच बोलायला लावू नका,…घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी” असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.
त्याची आपल्याला चिंता नसावी..उगगाच बोलायला लावू नका,…घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी …..@sheetalmhatre1 https://t.co/a5HLSZ9vSI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023
राज्यात एकीकडे सत्तासंघर्षांवरून वातावरण तापलेले आहे. दुसरीकडे अवकाळी सारख्या कारणांमुळे शेतकरी हैराण झाला आहे. विरोधक सत्ताधारी यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशात शीतल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरु झालेले हे ट्विटरवॉर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा विषय ठरत आहे.