नवी दिल्ली – एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ते नेहमी नवीन बदल करताना दिसून येत आहे.ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते अनेक वेगळ्या गोष्टीचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लॉंच केले आहेत. आता पुन्हा एकदा शब्द मर्यादेबाबत ट्विटरने नवीन अपडेट आणल्याचे समजते.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अक्षर मर्यादा (कॅरेक्टर लिमिट) 25,000 पर्यंत वाढवली आहे. तसेच, युजर्स आता कॅरेक्टर्ससह इमोजी जोडण्यास सक्षम असतील. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून याची घोषणा केली आहे. ट्विटरनुसार, या फीचर्सचा फायदा फक्त ब्लू सबस्क्रिप्शन प्लान घेणाऱ्या युजर्सनाच मिळणार आहे. कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी “लॉंग फॉर्म पोस्टमध्ये सुधारणा करण्यात आली आहे,’ असे यावर एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी 14 एप्रिल रोजी कंपनीने ब्लू सब्सक्राइबर्ससाठी अक्षर मर्यादा 280 वरून 10,000 पर्यंत वाढवली होती. आता बोल्ड आणि इटॅलिक असे टेक्स्ट फॉरमॅटिंग देखील ट्विटरवर वापरले जाऊ शकते. यासोबतच ट्विटरच्या निर्मात्यांसाठी कमाईचे फीचरही सुरू करण्यात आले आहे. म्हणजेच आता तुम्ही ट्विटरवरून पैसे देखील कमवू शकणार आहात.
Improved longform posts https://t.co/Wau6wOeoyH
— Elon Musk (@elonmusk) June 29, 2023
मी महिन्यामध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओंचीही घोषणा केली. मस्क यांनी लिंडा याकारिनो यांच्याकडे ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून ट्विटर अनेक नवीन नवीन बदल करत आहेत. पुढील काही महिन्यात ट्विटरने इतर सोशल मीडियाप्रमाणे हटके मॉनिटायझेशन फॉरमॅट लॉन्च केला तर आश्चर्य वाटणार नाही कारण गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरने असे बदल करायला सुरुवात केली आहे ज्याचा कोणी याआधी विचारही केला नसेल.