बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच चर्चेत असते. इराने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. मात्र, आता आमिरची लेक इरा काही दिवसांपासून एका लग्नाच्या फंक्शनमध्ये व्यस्त आहे. इराच्या चुलत भावाचे लग्न असून इराने फंक्शनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहेत.
या फोटोत नुपूर शिखरे देखील तिच्यासोबत दिसत आहे. नुपूर आणि इरा यांची नावे बऱ्याच काळापासून चर्चेत राहिली आहेत. असे बोलले जात आहे की इरा ही नूपुरला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. या ट्रीपचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.
दरम्यान, इरा आणि नुपूरने आपल्या नात्याबाबत अद्याप अधिकृतपणे कधीही खुलासा केलेला नाही. मात्र, नुपूरला इरासोबत ज्या प्रकारे त्याच्या फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र पाहिले जात आहे, यावरून हे स्पष्ट होत आहे की, दोघांच्या नात्यासाठी कुटुंबही सहमत आहे. काही दिवसांपूर्वीच “जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यालाही चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता.