जामखेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका युवकाचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे, सदर व्यक्ती सास-याला भेटायला मुंबईला जाऊन आला होता अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिली. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी जामखेड पॅटर्न राबवून जामखेड कोरोनमुक्त केले होते. त्यामुळे शहरातील बाजार पेठा चालू असून दरदिवशी बाजारपेठेत खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी आणि गर्दी दरम्यान नियमांचे होणारे सर्रास उल्लंघन आता नित्याचेच झाले आहे. मात्र शहरवासीयांकडून सुरू असलेला हाच बेफिकिरीपणाच आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जामखेड तालुक्यातील जवळका येथील युवक हा मुंबई येथे असलेला सास-याला सहा दिवसापूर्वी भेटायला गेला होता. तो रविवारी खर्डा येथे क्वारंटाईन होण्यासाठी आला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी त्यास स्वॅब घेण्यासाठी अहमदनगर येथे पाठवले होते. त्याचा बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दोन महिन्यानंतर प्रथमच कोरोनाचा पुन्हा जामखेडमध्ये शिरकाव झाला आहे. आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे यांनी या युवकास डॉ. आरोळे हॉस्पिटल येथे क्वारंटाईनमध्ये घेऊन गेले. तेथे त्याची अधिक चौकशी केली. मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सासºयाला भेटायला गेलो होतो, असे याने सांगितले. त्यामुळे सदर युवकाला त्यांनी तातडीने येथे स्वॅब तपासणीसाठी रविवारी पाठवले होते आज दि २४ रोजी त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान मार्च व एप्रिल महिन्यात जामखेड मध्ये कोरोनाचे जिल्हात सर्वाधिक 17 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी एकाच मृत्यू झाला होता त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी जामखेड मध्ये ‘जामखेड पॅटर्न’ राबवुन जामखेड शहर एक महिना हाॅस्टस्पॅट झाले होते प्रशासनामार्फत अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात आल्या होत्या आमदार रोहित पवार यांचा जामखेड पॅटर्न राज्यात गाजला होता यांला आता सुरूंग लागला आहे