नवी दिल्ली – राजकीय व्यासपीठावर सध्या तुकडे तुकडे गॅंग असा शब्दप्रयोग सातत्याने केला जात आहे भाजप विरोधकांना उद्देशून अनेकवेळा हा शब्दप्रयोग वापरला गेला आहे पण आता कॉंग्रेसचे नेतेच मोदी शहा आणि अन्य भाजप नेत्यांना उद्देशून तुकडे तुकडे गॅंग हा शब्द प्रयोग वापरत आहेत.
हा तुकडे तुकडे गॅंग काय प्रकार आहे, देशात अशी कुठली गॅंग अस्त्विात आहे काय असा लेखी प्रश्न कॉंग्रेसचे सदस्य विसेंट पाला आणि जसबीसिंग गिल यांनी सरकारला विचारला होता. त्यावर लोकसभेत लिखीत उत्तर देताना गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटले आहे की अशा नावाने देशात कोणतीही गॅंग अस्तित्वात नाही.
देशातील पोलिसांकडे तशी कोणतीही नोंद नाही. या प्रकरणी सरकारला असेही विचारण्यात आले होते की देशात तुकडे तुकडे गॅंगच्या नावाने काही जण कार्यरत असल्याची माहिती गुप्तचर सुत्रांना मिळाली आहे काय, सरकारने अशा नावाने कार्यरत असलेल्या लोकांचा शोध घेतला आहे काय, त्या विषयीचा कोणता कॅटलॉग सरकारने तयार केला आहे काय, असे प्रश्न सरकारला विचारण्यात आले होते. पण त्या सर्व प्रश्नांना नाही असे उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे.