वॉशिंग्टन : सर्वसाधारणपणे समुद्राच्या तळाशी भूकंप झाले भयानक लाटा निर्माण होऊन त्सुनामी येते. जमीनवर होणाऱ्या भूकंपाची साधारण सूचना मिळत असली तरी त्सुनामी मात्र अचानक येत असल्याने ती जास्त हानिकारक ठरते. याच पार्श्वभूमीवर आता नासाने विकसित केलेल्या गार्डियन प्रणालीच्या माध्यमातून अंतराळातूनच आता सुनामीचा इशारा देणे शक्य होणार आहे.
पॅसिफिक महासागरात आत्तापर्यंत साडेसातशे पेक्षा जास्त त्सुनामी येऊन गेल्या आहेत त्याच क्षेत्रामध्ये या गार्डियन प्रणालीची चाचणी करण्यात येत आहे. या क्षेत्रात रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात ही चाचणी करण्यात येत आहे. समुद्रामध्ये जेव्हा भूकंप होतो किंवा दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात किंवा वादळ निर्माण होते तेव्हा हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होतो.
धुलीकण तयार होतात आणि हवेचा वेग बदलतो या बदलांची नोंद ही सिस्टीम करणार असून त्या आधारे त्सुनामीचा इशारा मिळणे शक्य होणार आहे. पॅसिफिक महासागरातील रिंग ऑफ फायर हे क्षेत्र म्हणजे सर्वात भूकंप प्रवण क्षेत्र मानले जाते. गेल्या शंभर वर्षांच्या कालावधीमध्ये या ठिकाणी साडेसातशे पेक्षा जास्त सुनामी येऊन गेल्या आहेत. या परिसरामध्ये समुद्राच्या खाली सतत भूकंप होत असतात आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो.
जगातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 78% पेक्षा जास्त त्सुनामी केवळ याच क्षेत्रामध्ये निर्माण होतात म्हणून नासाची ही सिस्टीम सध्या याच प्रदेशामध्ये कार्यरत करण्यात आली आहे. हे एकूण क्षेत्र सुमारे 40,000 किलोमीटरचे असून या प्रणालीच्या माध्यमातून या प्रदेशातील त्सुनामीचा इशारा मिळाला तर भविष्यातील प्राणहानी आणि वित्तहानी टळू शकते असे शास्त्रज्ञांना वाटते.