मुंबई – बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुखने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या हटके स्टाईलने त्याने सर्वांनाच घायाळ केले आहे. नुकतेच शाहरूखला सिनेसृष्टीत 31 वर्ष पूर्ण झाले आहे. 25 जून 1992 रोजी ‘दीवाना’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानिमित्त त्याने आस्क एसआरके हे सेशन केले. यावर अनेकांनी शाहरूखला प्रश्न विचारले. यावेळी एका चाहत्याने त्याला सिगारेटबाबत विचारलेल्या प्रश्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सुरुवातीला शाहरुखने त्याच्या ट्विटरवर लिहिले की, ‘दिवाना रिलीज होऊन 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा हा प्रवास खूपच रोमांचक आहे. एका चाहत्याने शाहरुखला विचारले की त्याच्या ‘दीवाना’च्या सेटवरील काही कधीही विसरू न शकणाऱ्या आठवणी आहेत का? तेव्हा शाहरुखने सांगितले की त्याला दिव्याजी (दिव्या भारती) आणि राजजी यांच्यासोबत काम करायचे आहे.
दुसऱ्या एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, ‘दीवाना’मधील त्याचा एन्ट्री सीन कसा वाटला. याला उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, ‘मी हेल्मेट घालायला हवं होतं!’ तर आणखी एका चाहत्याने शाहरुखला सिगारेट ओढण्याची ऑफर दिली, ज्याला शाहरुखने भन्नाट उत्तर दिले. ‘आपण एकत्र सिगारेट प्यायला जायचं का?’, असा चाहत्याचा प्रश्न होता. याला उत्तर देताना शाहरुखने लिहिले की, ‘माझ्या वाईट सवयी मी एकटाच करतो.’ शाहरुखच्या या उत्तराचे अनेकजण कौतुक करत आहे.
Main apni buri aadatein akele hi karta hoon!! https://t.co/POWpR67dzu
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 25, 2023
दरम्यान, शाहरुखने ४ वर्षांनंतर ‘पठान’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तो लवकरच ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात नयनतारा आणि विजय सेतुपती देखील दिसणार आहेत. याशिवाय शाहरुख दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ या चित्रपटातही दिसणार आहे.