वॉशिंग्टन : महाभियोगाच्या दोन्ही आरोपांमधून निर्दोष मुक्त झाल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी सूडाचे राजकारण सुरू केले आहे. या निकालानंतर तीन वर्षांनी त्यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेमध्ये साक्षीदार बनलेल्या दोन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. गोर्डन सोन्डलॅन्ड आणि लेफ्टनंट कर्नल अलेक्झांडर विन्डमॅन हे ते अधिकारी आहेत. विन्डमॅन हे व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील युक्रेनमधील तज्ञ आहेत.
तर गोर्डन सोन्डलॅन्ड युरोपिय संघातील अमेरिकेचे राजदूत आहेत. विन्डमॅन आणि सोन्डलॅन्ड हे दोघेही महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान प्रतिनिधीगृहामध्ये झालेल्या सुनावणीत प्रमुख साक्षीदार होते. या दोघांना परत बोलावण्यात यावेत, असे आदेश ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले.
त्यानुसार दोघांचीही ताबडतोब उचलबांगडी करण्यात आली आहे. विन्डमॅन यांचे जुळे बंधू लेफ्टनंट कर्नल येव्गेनी विन्डमन यांनाही व्हाईट हाऊसने काढून टाकले. दोघांनी व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत काम केले आहे. महाभियोगाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांना बरखास्त करण्याबाबत व्हाईट हाऊसने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.