बीड – बीडजवळ वैद्यकिन्ही येथे बोलेरो आणि ट्र्कचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात जण जागीच ठार झाले तर तीन गंभीर जखमी आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकिन्ही येथे रविवारी सकाळी ट्रकने बोलेरो गाडीला जोरदार धडक दिल्याने सात जण जागीच ठार झाले. यामध्ये दोन महिलांसह एका बाळाचा समावेश आहे. सर्व मृत निवडुंगवाडीचे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.