मुंबई – बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडे नाही. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा देणार का असा प्रश्न विचारला असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीची निवडणुकपूर्व आघाडी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास तो दोन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा करून घेतला जाईल’ असे सुचक वक्तव्य केले आहे.
Sharad Pawar, NCP on Shiv Sena MP Arvind Sawant’s resignation as Union Minister: I haven’t had a word with anyone regarding anyone’s resignation.We’ll have a word with Congress today.Whatever decision is to be taken will be taken only after discussions with Congress. #Maharashtra https://t.co/qgI4HIzPff pic.twitter.com/CFLve9vo0u
— ANI (@ANI) November 11, 2019
दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पहायला मिळत आहे. आज मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचे सर्व नेते सहभागी होणार असून शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Congress has called a Congress Working Committee (CWC) meeting today at Congress interim President Sonia Gandhi’s residence in Delhi, over the political situation in Maharashtra. pic.twitter.com/UB5abfaZtQ
— ANI (@ANI) November 11, 2019
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्ही कॉंंग्रेससोबत चर्चा घेऊऩच आमचा निर्णय जाहीर करू, दुसरीकडे कॉंंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आज कॉंंग्रेसची बैठक होणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात कॉंंग्रेसची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद झाले. त्यानंतर भाजपने शिवसेनेच्या भूमिकेवर बोट ठेवत सत्ता स्थापन करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, आज शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.