संघाची तुलना तालिबानबरोबर केल्यामुळे जावेद अख्तर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यावरून जावेद अख्तर यांना ट्रोल केले जाऊ लागले आहे. त्यातच “गि बॉस’मधील स्पर्धक उर्फी जावेद हिला तिच्या पेहरावामुळे ट्रोल केले जायला लागले आहे.
ही उर्फी जावेद म्हणजे जावेद अख्तर यांची नात असल्याचे समजून तिलाही ट्रोल केले जायला लागले आहे. मात्र प्रत्यक्षात या दोघांचे एकमेकांशी कोणतेही नाते नाही.
केवळ दोघांचेही नाव सारखे आहे, एवढेच. उर्फीला होणारे ट्रोलिंग खूपच वाढायला लागल्यावर जावेद अख्तर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी मध्यस्थी केली आहे. “उर्फीचा आमच्याशी काहीही संध नाही.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावर उर्फीने आपले मौन सोडले आहे. “केवळ आडनावामुळेच आपल्याला जावेद अख्तर यांची नात समजले जाणे खूपच मजेशीर आहे.’ असे ती म्हणाली.
“बिग बॉस’मध्ये उर्फी जावेदचा प्रवास खूपच लवकर समाप्त झाला. मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ती सोशल मीडियावरून खूपच ऍक्टिव्ह राहिली होती. तिच्या चित्रविचित्र पेहरावामुळे तिला पब्लिकने खूप ट्रोल केले होते.