चंदीगड: हुतात्मा उधमसिंग यांना आज त्यांच्या 81 व्या हौताम्य दिनानिमित्त पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आदींनी आदरांजली वाहिली.
उधमसिंग यांनी मिचेल ओडवायर या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या प्रकरणात 31 जुलै 1940 या दिवशी लंडनच्या पेंटोनविले कारागृहात उधमसिंग यांना फासावर चढवण्यात आले होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी उधमसिंग यांनी ओडवायर यांची हत्या केली होती.
शहीद-ए-आझम उधमसिंगजी हे एक महान देशभक्त होते, त्यांची देशभक्ती आणि त्यांनी देशासाठी दिलेले हौतातम्य संपूर्ण देशाला प्रेरणा देत राहील, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. शहीद उधमसिंग यांचे स्मारक संग्रुर जिल्ह्यात उभारले जाणार असून ते वर्षभरात पूर्ण होईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दिली आहे.