हैदराबाद: येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 कोटी 66 लाख रुपयांचे 3 किलो 11 ग्रॅस सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रवासी सौदी अरेबियातून येथे आले होते.
वंदे भारत मिशन तर्फे जी विशेष विमाने विदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहेत त्याचा लाभ घेऊन हे प्रवासी गुरुवारी हैदराबादला आले होते. त्यांनी आपल्या पॅंटच्या आतल्या चोर कप्प्यांमध्ये हे सोने लपवले होते.
दुसऱ्या एका प्रकरणात सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी 78.5 किलो चंदन देशाबाहेर नेण्याचा प्रकार उघडकीला आणला. याप्रकरणी पाच प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे प्रवासी हैदराबादहून सुदानला चालले होते.