मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये ट्रॅविस हेड या नवोदित फलंदाजाने अविश्वसनीय खेळी केली. त्याने येथे सुरू असलेल्या मार्श कप क्रिकेट स्पर्धेत केवळ 127 चेंडूंत द्विशतक फटकावताना 230 धावा केल्या.
दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार असलेल्या हेडने आपल्या खेळीत 28 चौकार आणि आठ षटकार अशी आतषबाजी केली. हे त्याचे दुसरे द्विशतक ठरले आहे.
त्याच्या खेळीमुळे दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाने 48 षटकांचा खेळवण्यात आलेल्या या सामन्यात 8 बाद 391 असा धावांचा डोंगर उभार केला. या सामन्यात क्विन्सलॅंडला सामना 67 धावांनी गमवावा लागला.