T-20 World Cup | “मेन इन ब्लू’ जर्सीचे थाटात अनावरण

मुंबई – आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे बुधवारी थाटात अनावरण करण्यात आले. या अनावरण सोहळ्याचा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्‌विटर हॅंडलवर पोस्ट केला.

गेल्या काही वर्षांनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा आपल्या प्रसिद्ध मेन इन ब्लू या ड्रेसकोडमध्ये दिसेल. अधिकृत किट प्रायोजक असलेल्या एमपीएलचा लोगो या जर्सीवर असून संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या बायजूजचाही लोगो या जर्सीवर आहे.

लोकेश राहुल, उपकर्णधार रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी ही नवी जर्सी घातलेला हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.