पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. तर शहरात नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात आल्या असून बुधवारी (दि. 4) पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी याबाबतचे आदेश दिले.
आयुक्तालयातील तीन पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक व सहा उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक नारायण पवार (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते संगणक कक्ष), पांडुरंग बाबासाहेब गोफणे (देहूरोड पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), भानुदास आण्णासाहेब जाधव (म्हाळुंगे पोलीस चौकी ते पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा युनिट तीन) अशी बदली करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक विजय पांडुरंग गरुड (पिंपरी पोलीस ठाणे ते सायबर कक्ष), चैत्राली सतीश गवळी (सांगवी पोलीस ठाणे ते संगणक कक्ष), तर उपनिरीक्षकांमध्ये रमेश महादेव केंगार (हिंजवडी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), प्राची गोरख तोडकर (देहुरोड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), फारुख याकुब सय्यद सोलापुरे (चिखली पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), विक्रम पासलकर (चाकण पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), विजय जगदाळे (चाकण पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), सोमनाथ बापूराव हंडाळ (भोसरी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा) अशी बदली करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त गडचिरोली येथून आयुक्तालयामध्ये बदलून आलेले उपनिरीक्षक रामदास बाबूराव जाधव यांची भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर अवधूत महादेव शिंगारे यांची वाकड पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.