रांगोळीतून साकारली गणरायाची विविध रूपे

पिंपरी – रांगोळीच्या माध्यमातून गणरायाच्या विविध रूपांचा आविष्कार चिंचवडगाव येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात पाहण्यास मिळत आहे. अंशुल क्रिएशन्स या संस्थेने भरविलेल्या या प्रदर्शनात मुंबईतील प्रसिद्ध रंगावलीकार नंदू शिंदे यांनी रांगोळ्या काढल्या आहेत.
नगरसेवक शितल शिंदे यांच्या हस्ते बुधवारी या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

प्रदर्शनात अष्टविनायकाची आठ रूपे, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई (पुणे), आणि मुंबईतील सिद्धीविनायक व लालबागचा राजा आदी रूपे प्रत्येकी आठ फूटी रांगोळीतून काढण्यात आली आहेत. श्री गणेशाची थ्रीडी रांगोळी हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय आहे. त्यासाठी 84 किलो रांगोळीचा वापर केला आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

प्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी माजी अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, सह-शहर अभियंता (विद्युत) प्रवीण तुपे, संवादिनी वादक मिलिंद दलाल, संभाजी बारणे, माजी नगरसेवक अप्पा बागल, नीता परदेशी, प्रा. गोरख ब्राम्हणे आदी उपस्थित होते. अंशुल क्रिएशनचे विजय जगताप यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.