सस्पेंन्स, थ्रीलरने ठासून भरलेल्या ‘विक्की वेलिंगकर’चा ट्रेलर रिलीज

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंत अनेक रहस्यमय चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.या चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता पहायला मिळते. मराठीमध्ये पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ लूक असलेला प्रयोग आगामी ‘विक्की वेलींगकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका आहे. मात्र, ‘मास्क मॅन’च्या मागे कोणाचा चेहरा दडलेला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आता या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटात सोनाली कॉमिक बुक आर्टिस्टच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते. ट्रेलर मध्ये सोनालीची दमदार झलक पाहायला मिळते. चित्रपटात सस्पेंन्स, थ्रीलरने ठासून भरलेला आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीनच ताणली गेली आहे. ‘विक्की वेलिंगकर’ हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला होणार प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.