रडायचंय मग लाजता कशाला… समस्त पुरूषी अहंकावर मास्टर ब्लास्टरचा स्ट्राइक

मुंबई : पुरषासारखा पुरूष असूनही रडतोस काय? असं आता कोणी म्हणायचं कारण नाही. कारण पुरूषांनी रडण्यात लाजण्यासारखं काहीच नाही, असं दस्तूरखुद्द सविन तेंडूलकरनं म्हटलंय. आपल्यालाही कधी काळी रडणं हे कमजोरपणाचं लक्षण वाटायचं, मात्र आता तसं काही वाटत नसल्याचं त्यानं नमुद केलंय.

आंतरराष्ट्रीय पुरूष सप्ताहानिमित्त त्याने एक अनावृत्त पत्र लिहलंय. त्यात हा विक्रमादित्य म्हणतो, डोळ्यात आसवं जमा होण्यात वावगं काहीच नाही. मग तुम्हाला अधिक कणखर बनवणारे अश्रु तुम्ही का लपवता? या मागं एकच कारण पुरूषानं रडायचं नाही, असंच आम्हाला लहानपणापसून शिकवलंय. त्यावर विश्‍वास ठेवतच मी मोठा झालो. पण माझं ते समजणं चुकीचं होतं याची जाणीव मला झाली, म्हणूनच मी हे पत्र लिहतोय. माझ्या वेदना आणि संघर्षानं मला घडवलं. एक चांगला माणुस बनवलं.

तुमच्या वेदना आणि असुरक्षितता व्यक्त करायला खुप मोठं धाडस लागतं. पण जसा सुर्याचा उदय होतो तसाच तुमचाही उदय होऊ द्यात. त्यामुळे पुरूषांनी हे कारावं ते करू नये असल्या बुरसटलेल्या कल्पना आणि परंपरागत समजुतीला सोडून देण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करतो. तुम्ही कोणी असा… कोठेही असा… तुम्हाला हे धाडस लाभो, असं चिंतत सचिन म्हणतो, भय, शंका आणि दु:ख येणारच आहेत. त्याला मोडून काढण्यासाठी सरसावण्याची गरज असते.

निश्‍चितपणे तुम्ही कधीतरी पराभूत होता, त्यावेळी तुम्हाला रडावं वाटतं तेंव्हा ते वाटणं बाहेर येऊ द्या. पण येवढं नक्की, तुम्हाल तुमचे अश्रु रोखता आले पाहिजेत आणि तुम्हाला कणखर व्हायला हवं कारण पुरूष तेच करतो…

माझ्या क्रिकेटच्या निवृत्तीच्यावेळी मी कोलमडून गेलो होतो. मी भावनांवर ताबा ठेवू शकलो नाही. त्यावेळी माझा प्रत्येक शब्द माझ्या घशात अडकत होता. सारं काही संपल्याची ती भीती होती. त्यावेळी माझ्या मनात असंख्य विचारांचं काहूर माजलं होतं. मी ते तसंच सुरू राहू दिलं आणि त्याच्याशी संघर्ष केला नाही. मी जगाला त्या अवस्थेत सामोरा गेलो आणि आश्‍चर्यकारकरित्या माझ्या मनाला शांतता लाभली. मला स्वत:ला सादर करताना मला मी कणखर झाल्याचं जाणवलं आणि मला मला जे काही मिळालं त्याबद्दल कृतज्ञ झालो. मला त्यावेळी जाणवलं मी पुरेसा पुरूष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.