वाडा- खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा ते डेहणे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून या मार्गाने प्रवास करणे म्हणणे आपघाताला निमंत्रण देण्यासाखेच आहे.
वाडा ते डेहणे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसले असून खड्ड्यांत रस्ते की रस्त्यात खड्डे असे म्हणण्याची वेळ प्रवाशांना आली आहे. तर रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे पायी चालणाऱ्यांची कुंचबणा होत असून वाहनांमुळे एखादा दगड उडून पादचाऱ्याला लागून तो गंभीर जखमी होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
तर साइडपट्ट्याही खचल्या असल्याने वाहन रस्त्यावरून खाली उतरले तर वाहनांचा तोल एका बाजूला झुकलेला असतो जर वाहनचालकाला ते सांभाळता नाही आले तर वाहन उलटण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी व साईड पट्ट्या भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला खड्डी पडली आहे; मात्र तीचा वापरच न झाल्याने ती अस्ताव्यस्त पसली असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे.
श्रीश्रेत्र भीमाशंकरकडे वाडामार्गे जाणाऱ्या वाहनांना हा रस्ता सोयीस्कर आहे. त्यातच शुक्रवारी (दि. 21) महाशिवरात्री निमित्त भीमाशंकरला जाणारे असंख्य भाविक या रस्त्याचा वापर करणार असल्याने या एक दोन दिवसांत या रस्त्याची तत्पुरती तरी मलमपट्टी करून वाहचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.