खेडशिवापूर -शनिवार रविवार आणि त्यातच जोडून आलेली नाताळच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटक, नागरिकांमुळे पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याचा परिणाम खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. सुटीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडल्या कारणाने पुणे-सातारा रोडवरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणा वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली होती.
शनिवारी सकाळपासूनच पुणे व मुंबई कर मोठ्या संख्यने बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. तसेच टोल नाक्यावरील ढिसाळ कारभारामुळे या रांगा वाढतच गेल्या. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात वेळ खर्च झाल्याकारणाने मनस्ताप सहन करावा लागला.
त्याचबरोबर मोठा गवगवा करून केंद्र शासनाच्या आदेशानंतर फास्टॅग यंत्रणा ही सर्व टोलनाक्यांवर लावण्यात आली होती. मात्र या यंत्रणेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव नेटवर्कची कमतरता यामुळे वारंवार या यंत्रणेत बिघाड होत असल्याकारणाने किंवा विलंब लागत असल्याकारणाने प्रवाशांना वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.